पंढरपूरच्या विकासासाठी 647 कोटी : मुख्ख्यमंत्री

शनिवार, 28 मार्च 2015 (11:02 IST)
पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास तीन टप्प्यात करण्यात येणार असून यासाठी 647 कोटी रुपये खर्च केला जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
 
पंढरपूरच्या सुरक्षेच्यादृष्टीनेही ऑडीट करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
यासंदर्भात आमदार भारत भालके यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर उत्तर देताना ते बोलत होते. पंढरपुरातील 41 गावांचा तीन टप्प्यात विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करण्यात येईल. त्यासाठी पंढरपूर विकास प्राधिकरणही स्थापण्यात आले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. पंढरपूरमध्ये येणार्‍या भाविकांची संख्या 10 लाख इतकी आहे. 
 
बंधारा बांधणे, घाट, नदीवरील पुलांचे बांधकाम, वारकर्‍यांना निवास, 975 शौचालयांची उभारणी आदी सुविधा देण्यात येणार आहेत. चंद्रभागा नदी प्रदूषित होऊ नये यासाठी भुयारी गटार टप्पा-3 बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा