तोकडे कपडे घातल्याने बहिणीची हत्या

बुधवार, 5 ऑगस्ट 2015 (11:29 IST)
कॉलेजला जाताना तोकडे कपडे घालते आणि मित्रांशी बोलते म्हणून रागाच्या भरात तिच्या भावाने केलेल्या बेदम मारहाणीत १८ वर्षीय ऐश्वर्या लाडचा मृत्यू झाला.

पोलिसांनी आरोपी ओंकार लाड (१९) यास अटक केली असून तो मनोरुग्ण आहे. ऐश्वर्या अकरावी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत होती.  ओंकारने तिला बंद खोलीत मारहाण केली. आईने त्यास दरवाजा उघडण्यास सांगितले. त्याने दरवाजा उघडला असता ऐश्वर्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. ऐश्वर्याच्या आईचा आक्रोश ऐकून शेजारी जमा झाले.

त्यांनी जखमी ऐश्वयार्ला रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा