गारपिटीवर ‘अवकळा’नाही

शनिवार, 18 एप्रिल 2015 (10:52 IST)
महाराष्ट्रात  सध्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीचे थैमान सुरु असले तरी याचा मान्सूनवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यंदा २७ मेच्या आसपास मान्सून दाखल होणार असून सरासरी १०२ टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणाºया या संस्थेने वर्तविली आहे.

सर्वसाधारणपणे ३० मेच्या आसपास दक्षिण केरळमध्ये नैर्ऋत्य मान्सून सक्रिय होतो. तो १ जूनपासून या राज्याच्या उत्तर भागाकडे वाटचाल करू लागतो, असा अंदाज आहे. मेमध्येही अधूनमधून अवकाळी पावसाचा तडाखा बसेल.  सध्याच्या वातावरणावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. उर्वरित एप्रिल आणि मेमध्ये देशभरात पावसाच्या सरी दिसतील, असे स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीनसिंग यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा