अमिता चव्हाण यांच्या विजयासाठी अखंड पाठ

शनिवार, 18 ऑक्टोबर 2014 (10:39 IST)
नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार अमिता चव्हाण यांच्या विजयासाठी श्री सचखंड हुजूरसाहिब गुरुद्वारात अखंड पाठ केले जात आहेत.  अखंड पाठाचा शुक्रवारी प्रारंभ करताना अशोक चव्हाण, अमिता चव्हाण, डी.पी. सावंत, ओमप्रकाश पोकर्णा हे पुजेला बसले होते.

गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांनी सर्व काँग्रेस नेत्यांना विजयासाठी आशीर्वाद दिले. यापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विधानसभेच्या पाच निवडणुका लढले. प्रत्येक निवडणुकीत मतदान झाल्यानंतर गुरुद्वारात अखंड पाठ करण्यात आले.

वेबदुनिया वर वाचा