Ram navami Puja 2024: श्रीरामनवमी पूजा साहित्य आणि पूजा विधी

मंगळवार, 16 एप्रिल 2024 (07:24 IST)
Ram Navami 2024 : प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीला राम नवमी/ राम जन्मोत्सव पर्व साजरे केले जाते. प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षी देखील रामनवमीचे हे पर्व मोठया उत्साहात साजरे केले जाणार आहे. 
 
हिंदू कॅलेंडर अनुसार या वर्षी रामनवमी पर्व 17 एप्रिल 2024, बुधवार या दिवशी साजरे केले जाणार आहे. श्रीराम यांच्या पूजेमध्ये शुद्धता आणि सात्विकता महत्वपूर्ण आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून व्रत करून श्रीरामांची पूजा करावी. तर चला जाणून घेऊ या श्रीरामनवमी पूजा साहित्य आणि पूजा विधी 
 
पूजा साहित्य- 
प्रभू श्रीरामांची चांदीची किंवा पितळाची मूर्ती 
राम दरबार 
कुंकू 
मौली 
चंदन 
अक्षदा 
कापूर 
फुले 
हार 
तुळशीपत्र 
अष्टगंध 
लवंग 
वेलची 
बुक्का  
गुलाल 
ध्वज 
केशर 
पंचखाद्य 
5 फळे 
हळद 
अत्तर 
अभिषेकसाठी दूध 
साखर 
गंगाजल
दही
मध 
तूप 
मिठाई 
पिवळे वस्त्र 
धूप 
दीप 
सुंदरकांडचे पुस्तक 
रामायणची  पुस्तक 
हवन साहित्य 
हवन कुंड
गाईचे तूप 
तांदूळ 
आंब्याचे लाकूड 
जव 
तीळ 
आंब्याची पाने 
बेल 
चंदनाचे लाकूड 
अश्वगंधा 
जटाधारी नारळ 
नारळ गोळा इत्यादी 
 
पूजाविधी- 
* रामनवमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्य क्रिया करून स्वच्छ स्नान करावे.
* स्वच्छ किंवा कोरे वस्त्र परिधान करावे. 
* शुभ मुहूर्त मध्ये मंदिराची साफसफाई करावी.
* भगवंताचे स्मरण करून व्रत-उपवासाचा संकल्प करावा.  
* भगवान श्रीराम यांची चांदीची किंवा पितळाची मूर्ती किंवा रामदारबाराचे चित्र घेऊन लाल किंवा पिवळे कापड पसरवून त्यावर ठेवावे. 
* मूर्तीला स्नान घालावे किंवा जर चित्र असेल तर स्वच्छ पुसून घ्यावे. 
* मग मूर्तीला पंचामृत किंवा केशर दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करावा.
* मूर्तीच्या कपाळावर अनामिका बोटाने चंदन, अष्टगंध, बुक्का, गुलाल, हळद आणि तांदूळ लावावे. 
* श्रीरामांना पिवळ्या रंगाचे फुल वस्त्र, चंदन इत्यादी पूजा साहित्य व्हावे.
* मग फुले वाहून हार घालावा.
* धूप, उदबत्ती, निरंजन जरूर लावावे.
* कुटुंबासोबत हवन मध्ये देवदेवतांकरिता आहुती देणे.
* तुपाचा दिवा लावून आरती ओवाळणे.
* पूजा झाल्यानंतर नैवद्य दाखवावा. 
* प्रयेक पदार्थावर तुळशीपत्र ठेवावे. 
* नैवेद्यामध्ये पंचामृत, धणे पंजीरी, मिठाई ठेवावी.
* नैवेद्यामध्ये तुळशीपत्र ठेऊन नैवेद्य अर्पण करावा.  
* रामायणाचा पाठ करावा. 
* सुंदरकांडचा पाठ करावा. 
* मंत्र- 'ॐ श्रीं ह्रीं क्लीं रामचन्द्राय श्रीं नम:' हा मंत्र 108 वेळा जपावा.
* गंगाजल घरात सर्वदूर शिंपडावे. 
* घरातील सर्व साड्यांच्या कपाळी गंध लावावे.
*यानंतर घरच्या छतावर किंवा बाल्कनीमध्ये ध्व्ज लावावा.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती