चंद्रकांत खैरेंना शिवसेनेत किंमत नाही; निलेश राणेंची टीका

सोमवार, 30 मे 2022 (09:05 IST)
राज्यसभा निवडणुकीमुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबद्दल सुरु असलेल्या वेगगेगळ्या चर्चांना आता पुर्णविराम मिळाला असून, सर्वच पक्षांनी आपले उमेदवार घोषित केले आहेत. त्यानंतर आता निलेश राणे  यांनी शिवसेनेना नेते चंद्रकांत खैरेंवर हल्लाबोल केला आहे. चंद्रकांत खैरेंनी  नुकताच भाजपवर निशाणा साधताना भाजपने वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला पैसे दिल्याचा आरोप केला होता. त्यावरुन आता निलेश राणेंनी खैरेंना उत्तर दिलं आहे.

चंद्रकांत खैरे यांची खासदारकी गेली त्यामुळे ते सरबरीत झाले आहेत. त्यात आता संजय पवार यांना खासदारकी मिळाल्याने भर पडली आहे. खैरे यांना शिवसेनेत किमंत राहिलेली नाही अशी टीका निलेश राणे यांनी खैरे यांच्यावर केली आहे. भाजपने mim आणि बहुजन वंचित आघाडीला 1 हजार कोटी दिले असे खैरे यांनी म्हटले होते. त्याला निलेश राणे यांनी उत्तर दिले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसकडून इमरान प्रतापगडी यांना उमेदवारी घोषित करण्यात आली असून ते उद्या अर्ज भरणार असल्याचे समजते आहे. परंतु, या निणर्यावर राज्यातील कॉंग्रेस जनांमध्ये नाराजी असल्याचे समोर आले आहे. तर भाजपनेही  अखेरीस नावांची गुपिते उघडली आहेत. महाराष्ट्रातून भाजपाकडून पियूष गोयल आणि अनिल बोंडे  यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजप तिसरा उमेदवार देण्याचीही शक्यता आहे. यामुळे विधानसभेची लढत रंगणार असे दिसत आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती