संभाजी राजेंच्या या ट्विटमुळे नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे

शनिवार, 28 मे 2022 (22:13 IST)
छत्रपती संभाजीराजे भोसले अपक्ष उभे राहण्यामागे भाजपची (BJP) खेळी असल्याचा धक्कादायक दावा संभाजीराजेंचे वडील शाहू राजे (Shahu MaharaJ) यांनी केला आहे. पक्ष घोषित करणं हा निर्णय चुकला, असेही त्यांनी म्हंटले आहे. दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन राज्यात सध्या राजकारण तापत आहे. संभाजी राजेंना उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेनेनेवर (Shivsena) राजकीय पटलांवरुन मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता पुन्हा एकदा संभाजी राजे भोसले यांनी यावर ट्विट करुन आपलं मत व्यक्त केलं आहे.
 
शाहू महाराज म्हणाले होते की, उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा झाल्यानंतर ड्राफ्ट म्हणजे कच्चा मसुदा तयार झाला. फायनल झालं असतं आणि मग विचार बदलला असता तर मग यू टर्न मारला असे म्हणता आलं असतं. पण, संभाजीराजेंनी अपक्ष लढावं यासाठी भाजपनेच त्यांना भाग पाडलं, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता माजी खासदार छत्रपती संभाजी राज यांनी सांगितलं की, "छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे. माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही."
 
दरम्यान, शाहू राजे म्हणाले होते की की, 2009 सालापासून संभाजीराजे यांनी वाट वेगळी पकडली आहे. 2016 साली भाजपनं दिलेल्या खासदारकीला माझा विरोध होता. तरीही, संभाजीराजेंनी ती स्वीकारली, असो लोकशाही आहे. त्यावेळी देखील आमची चर्चा झाली नाही. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर मला सांगितलं होते. यावेळी राज्यसभेवर जाण्याबाबत जानेवारीपासूनच त्यांचे प्रयत्न सुरू होते. पण, त्यांनी मला कल्पना दिली नव्हती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती