साहित्य : 1 कप हिरवे मूग (मोड आलेले), 1 चमचा आलं मिरचीचे पेस्ट, 2 मोठे चमचे बेसन, कोथिंबीर बारीक चिरलेला, मीठ, गरम मसाला चवीनुसार.
कृती : हिरव्या मुगाला रात्रभर ओल्या कपड्यात भिजत ठेवून मोड आणावे. आता मोड आलेल्या मुगाला थोडंसं उकडून गार करून मिक्सरमधून काढून घ्यावे. नंतर या मिश्रणात मीठ, गरम मसाला, आलं, मिरची पेस्ट, हिरवी कोथिंबीर व थोडंसं बेसनही घालावे. आता तव्यावर तेल घालून धिरडे तयार करावे. सोनेरी होईपर्यंत दोन्हीकडून परतून घ्यावे. हे धिरडे स्वादिष्ट असून आरोग्यासाठीही उत्तम आहे.