यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे राजकीय गुरू देखील मानले जाते. स्वातंत्र्यलढ्यापासून यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणापर्यंत महत्त्वपूर्ण प्रभाव होता.
यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी कराड येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील त्यांना लहानपणीच सोडून देवाघरी गेले. यशवंतराव चव्हाण यांना कुटुंबाकडून स्वावलंबन आणि देशभक्तीची शिकवण मिळाली. यशवंतराव चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण कराडमध्येच झाले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर आणि पुणे येथून बीए आणि एलएलबी केले. १९३० मध्ये महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली. या चळवळीत सामील होऊन चव्हाण यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. तसेच १९३२ मध्ये ते पहिल्यांदा तुरुंगात गेले. तुरुंगात असताना ते मार्क्सवाद आणि मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांच्या संपर्कात आले आणि बाहेर आल्यानंतर ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले. तसेच यशवंतराव चव्हाण हे विद्यार्थीदशेपासूनच काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते आणि कायद्याचे शिक्षण घेत असतानाच १९४० मध्ये ते सातारा जिल्हा काँग्रेसचे प्रमुख झाले. महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वी १९५७ मध्ये ते मुंबईचे मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस नेते बनले. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर, १९६० मध्ये ते पहिले मुख्यमंत्री झाले.
तसेच चव्हाण यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. ते महात्मा गांधींच्या असहकार चळवळ आणि भारत छोडो आंदोलनात सहभागी होते आणि त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. तसेच देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जवळचे सहकारी असलेले चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली. या राज्याच्या निर्मितीच्या लढ्यात त्यांची भूमिका वादग्रस्त होती, परंतु नंतर भाषेच्या आधारावर वेगळे राज्य निर्माण करण्यात त्यांनी आघाडीची भूमिका बजावली. तसेच यामुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. जेव्हा महाराष्ट्राची स्थापना दीर्घ संघर्षानंतर झाली आणि त्यानंतर लगेचच चव्हाण यांना राजकारणासाठी केंद्रात बोलावण्यात आले, तेव्हा त्यांनी पंडित नेहरूंना पत्र लिहिले की त्यांना भारताचे संरक्षण मंत्री होण्यासाठी पात्रतेबद्दल काहीच माहिती नाही. मेनन यांच्या राजीनाम्यानंतर त्यांना केंद्रात जबाबदारी मिळाली. केंद्र सरकारमध्ये चव्हाण यांनी संरक्षण, गृह, परराष्ट्र आणि अर्थमंत्री तसेच उपपंतप्रधान म्हणून काम पाहिले. मितभाषी आणि कर्तव्यदक्ष प्रशासक अशी चव्हाण यांची ख्याती जगभर पसरली आहे. तसेच यशवंतराव चव्हाण यांचे निधन नोव्हेंबर २५, इ.स. १९८४ दिल्ली येथे झाला.