तो व्हिडिओमध्ये म्हणाला, कालच्या घटनेची मला खूप लाज वाटते. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने अटकेच्या पूर्वी व्हिडीओ बनवला आहे. मला कालच्या घटनेची खूप लाज वाटते. मी पुणे आणि महाराष्ट्र आणि भारतातील लोकांची माफी मागतो. मी पोलीस विभाग आणि एकनाथ शिंदे साहेबांची माफी मागतो. कृपया मला माफ करा आणि मला एक संधी द्या. हे पुन्हा कधीही घडणार नाही.
घटनेनंतर गौरव आहुजा 8 मार्च रोजी पुण्याहून कोल्हापूरला गेला.कोल्हापुरात प्रवेश करण्यापूर्वी त्याने आपली बीएमडब्ल्यू थांबवली आणि धारवाडला जाण्यासाठी दुसरे वाहन भाड्याने घेण्यासाठी एका स्थानिक ऑटो चालकाची मदत घेतली आणि संकेश्वरला पोहोचल्यावर त्याने ड्रॉयव्हरला त्याला पुण्याला घेऊन जाण्यास सांगितले आणि पुण्यात परतल्यावर त्याने चालकाला माफी मागण्याचा व्हिडीओ बनवण्यासाठी विनंती केली आणि माफी मागण्याचा व्हिडीओ बनवला आणि पोस्ट करून मित्रांना पाठवला.
पोलिसांनी गौरव आहुजाच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर सार्वजनिक उपद्रव, बेदरकारपणे वाहन चालवणे आणि सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात आणणे याचा समावेश आहे.