पुण्यात एका श्रीमंत माणसाच्या मुलाने आपल्या बीएमडब्ल्यू मधून उतरून मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या मधोमध्ये लघवी केल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तरुणाचा शोध सुरु केला आहे. स्थानिक लोकांनी त्या तरुणाला ढकलले तेव्हा त्याने आक्षेपार्ह वर्तन केले.
दरम्यान, स्थानिक लोकांनी या तरुणाचा व्हिडिओ बनवला जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर पोलिसांनीही ही घटना गांभीर्याने घेतली. पुण्यात या तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे.