घटनेच्या दिवशी पीडिता रात्री जेवण केल्यावर आपल्या मैत्रिणीसोबत चाळीत बसली होती. तेव्हा आरोपी आला आणि त्याने मुलीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. या अपघातात ती 60 टक्के भाजली असून मुलीचा चेहरा, मान, पोट, गुप्तांग, हात आणि पाय होरपळाले.या अपघातात आरोपी देखील भाजला आहे. पीडितेची प्रकृती गंभीर असून ती सध्या बोलण्याच्या स्थितीत नाही. मुलीवर कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मुलीच्या आईला त्यांच्या ओळखीतल्या मुलाने या घटनेची माहिती दिली.
पीडितेच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीचा हवाला देत, अधिकाऱ्याने सांगितले की पीडित आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते. ते गेल्या काही महिन्यांपासून मित्र होते आणि परिसरात भेटत असत. तक्रारीत असे म्हटले आहे की मुलीच्या आईने त्याला विचारले होते की ते प्रेमसंबंधात आहेत का, परंतु त्याने ते नाकारले होते.
मुलीची आई नंतर त्या माणसाला भेटली आणि तिला तिच्या मुलीला न भेटण्याची विनंती केली. पोलिसांनी सांगितले की, या घटनेत आरोपीलाही भाजल्याचे आढळले असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तक्रारीच्या आधारे, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या तरतुदींनुसार अॅसिड इत्यादी वापरून स्वेच्छेने गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.