पोलिस आणि अन्न आणि औषध नियंत्रण प्रशासनाने (FDCA) शनिवारी पुण्यातील एका कारखान्यावर छापा टाकला आणि 1400 किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीसीए)च्या पथकाने वाघोली परिसरातील कारखान्यावर छापा टाकला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
"छापादरम्यान आम्ही 1400 किलो भेसळयुक्त चीज, 400 किलो ग्लिसरॉल मोनोस्टीरेट पावडर, 1800 किलो स्किम्ड मिल्क पावडर आणि 718 लिटर पाम तेल असा 11 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत," असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत
मांजरी भागात एका शेतातील गोदामात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पनीरचा साठा करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखांतील अधिकाऱ्यांना मिळाली. नंतर ही माहिती पोलिसांनी एफडीए च्या पथकाला घटनेची माहिती देण्यात आली. आणि पोलिसांच्या पथकाने गोदामावर छापा टाकला आणि गोदामातून भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त करण्यात आला.