काय सांगता ! चिकन मटणासाठी रांगा

रविवार, 8 ऑगस्ट 2021 (11:10 IST)
आज दिव्याची अवस असल्यामुळे आणि आखाड महिना संपत आहे.उद्यापासून श्रावण लागणार.त्यामुळे अनेक ठिकाणी गटारी च्या निमित्ताने आखाड पार्टीचे आयोजन केले जाते.यंदाच्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दुकान कमी वेळेसाठी उघड्या आहेत.त्यामुळे चिकन मटण लवकर मिळावे.या साठी सकाळपासूनचगटारी अमावस्या च्या मुहूर्तावर पुणेकरांनी सकाळपासूनच मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर रांगा लावण्यास सुरुवात केली आहे.आखाड पार्टीचे आयोजन करणाऱ्यांनी तसेच मांसाहार खाणाऱ्यांनी चिकन मटणाच्या दुकानाबाहेर रांगा लावण्यास सुरुवात केली आहे. 
 
उद्यापासून श्रावण महिना लागल्यामुळे बरेच जण श्रावण पाळतात,आणि मांसाहार वर्ज्य करतात.त्यामुळे आज गटारी अवस असल्यामुळे चिकन आणि मटण खाण्याचा बेत आखातात.आणि आखाड पार्टीचे आयोजन करतात.आज रविवार आल्यामुळे ही दुप्पट संधी मांसाहार करणाऱ्यांना मिळाली आहे.त्यामुळे सकाळ पासून त्यांनी चिकन मटण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात दुकाना बाहेर रांगा लावल्या आहे.
 
कोरोनामुळे निर्बंध असल्याने दुकानांच्या वेळा कमी आहेत. त्यामुळे लवकर मटण, चिकन मिळावं यासाठी लोक गर्दी करत आहेत.ही गर्दी दुपारपर्यंत देखील वाढू शकते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती