काय सांगता, पुण्यातील ओला, उबरची सेवा बंद होणार

मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 (15:17 IST)
येत्या 20 फेब्रुवारी पासून ओला, उबेरची सेवा पुण्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅब चालक पुण्याच्या आरटीओ ऑफिस येथे जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या दरांना कंपन्या लागू न केल्यामुळे निर्देशन करणार आहे. येत्या 20 फेब्रुवारी पासून पुण्याच्या आरटीओ ऑफिस मध्ये निर्देशन व बेमुदत संप करणार आहे. 
 
प्रादेशिक परिवहन समितीचे अध्यक्ष व जिल्हाधिकाऱ्यांनी 1 जानेवारी 2024 पासून ओला, उबेरचे नवीन दर लागू केले असून कंपन्यांनी अद्याप नवीन दर लागू केले नाही. याचा फटका कॅब चालकांना बसत असल्याचे या कॅब चालकांनी सांगितले नवीन दर लागू झाल्यास कॅब चालकांना मिळणाऱ्या कमिशनात वाढ होईल. आणि याचा परिणाम व्यवसायावर होईल या भीतीमुळे कंपन्यांनी वाढवलेले दर लागू केले नाही. या मुळे कॅब चालकांनी 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास एकत्र येऊन संगम ब्रिज आरटीओ ऑफिसात येऊन निर्दशन करणार आहे. या बंदीसाठी सुमारे 20 हजार कॅब चालक एकत्र येणार आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती