रॉबिन झेकीयस नावाच्या व्यक्तीने डेअरी मिल्क मध्ये जिवंत आळी असल्याचा दावा करत हा व्हिडीओ शेअर केला आहे. अमीन पेटमधील रत्नदिप मेट्रो मधून खरेदी केलेल्या कॅडबरी डेरीमिल्क मध्ये चक्क जिवंत आळी सापडली. या चॉकलेटची एक्स्पायरी डेटपण जवळची आहे. हे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणं आहे. यांचा साठी जबाबदार कोण असा प्रश्न केला जात आहे.
यावर कॅडबरी कंपनीने देखील उत्तर दिल आहे. कंपनी म्हणाली, नमस्कार. मंडेलेज इंडिया फूड प्रायव्हेट लिमिटेडनेहमीच उत्पादनांचा उच्च दर्जा राखण्यासाठी प्रयत्नशील असते. तुम्हाला आलेल्या वाईट अनुभवासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी कृपया तुमची तक्रार suggestions@mdlzindia.com वर पाठवा. त्यासोबत तुमचं पूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर आणि खरेदीची माहिती द्या”, अशी विनंती कंपनीकडून संबंधित ग्राहकाला करण्यात आली आहे.