पुण्याच्या विमान नगर भागात एका बहुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पार्किंग केलेली कार खाली कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. पार्किंगची भींत कोसळून हे वाहन खाली पडले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मध्ये एक कार रिवर्स गिअर मध्ये चालत असून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पड़ते. आश्चर्य म्हणजे गाडीच्या आत वाहन चालक आहे. हा वाहन चालक मागच्या सीटवर जाऊन पडतो. त्याला या अपघातात किरकोळ दुखापत झाली असून तातडीने लोक कारजवळ जातात आणि त्याला कार मधून सुखरूप बाहेर काढतात.
सदर घटना पुण्यातील विमाननगर भागातील एका अपार्टमेंटची आहे. या घटनेच्या व्हिडिओ मध्ये एक चारचाकी वाहन पहिल्या मजल्याची भींत फोडून खाली कोसळताना दिसत आहे. सुदैवाने घटनेच्या वेळी खाली कोणीच नव्हते. या मुळे कोणालाही दुखापत झालेली नाही. ही घटना सोसयटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. या वर नेटकरी आपापली प्रतिक्रया देत आहे.