पुण्यात पत्नीला आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी पतीला जामीन

मंगळवार, 21 जानेवारी 2025 (17:01 IST)
Pune News: पुण्यात पत्नीला आत्महत्येस प्रवृत केल्या प्रकरणी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या एका व्यक्तीचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. संतोष सुधाकर शिळीमकर असे या व्यक्तीचे नाव असून त्याच्यावर पत्नीला आत्महत्येस प्रवृत करणे आणि क्रुरताने वागल्यामुळे भारतीय दंड संहिताच्या कलम 306 आणि कलम 498A अंतर्गत दोषी आढळले. संतोष यांच्या पत्नीने लग्नाच्या आठ वर्षानंतर जुलै 2012 मध्ये आत्महत्या केली होती. 

संतोष शिळीमकर यानी पत्नी आणि लहान मुलीला एका रात्री घराबाहेर नग्नावस्थेत उभे केल्याचे कृत्य केले. शिळीमकर यांनी पत्नीला मित्रांसाठी जेवण बनवायला सांगितले त्यामुळे दोघांमध्ये वाद झाले हा सर्व प्रकार त्यांच्या पत्नीने फोन करून आपल्या घरी सांगितला. शिळीमकर  पत्नीचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ करायचा. सततच्या त्रासाला कंटाळून तिने घराजवळील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. 

या प्रकरणी पुण्यातील सत्र न्यायालयाने ऑगस्ट2024 मध्ये शिळीमकर यांना दोषी ठरवले आणि त्यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र त्यांच्या वकिलांनी हा खटला परिस्थितिजन्य पुराव्यावर आधारित असून प्रत्यक्षात कोणताही पुरावा किवा  सोसाइड नोट नसल्याचा युक्तिवाद केला. शिळीमकर  यांच्या जामिनाला सरकारी वकिलाने विरोध केला. 
मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ति आर एन लढा यांच्या खंडपीठाने अपीलावर लवकरच सुनावणी होणार नसल्याचे सांगून शिळीमकर यांचा जामीन मंजूर केला. त्यांना 25 हाजर रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर शिक्षेला स्थगिती दिली. 
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती