शिवशाहीची बस सकाळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना उर्से टोलनाक्याच्या पुढे गेल्यानंतर ओझर्डे गावाजवळ आल्यावर बस ने अचानक पेट घेतला. या बस मध्ये 12 प्रवासी प्रवास करत होते. बस ने पेट घेतलेला समजतात बस चालकाने प्रसंगावधान राखत बसला रस्त्याच्या कडेला केली आणि सर्व प्रवाशांना बसमधून बाहर काढले. काही वेळातच बसने पेट घेतला आणि संपूर्ण बस जळून ख़ाक झाली. बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुखरूप बचावले.
नंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
शिवशाहीची बस पुण्याहून मुंबईकडे जात असताना बसने पेट घेतला. मात्र चालकाच्या प्रसंगवधानामुळे बस मधील 12 प्रवाशांना बसला रस्त्याच्या बाजूला बस घेऊन सुखरूप बाहेर काढले. चालकामुळे सर्व प्रवासी बचावले. या मुळे चालकाचे कौतुक केले जात आहे. या पूर्वी पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर दोन दिवसांपूर्वी बोरघाटात एका खासगी बसने पेट घेतल्याची घटना घडली होती.