परीक्षेत कॉपी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान युक्ती वापरली , काय केले हे जाणून घ्या

बुधवार, 22 डिसेंबर 2021 (13:29 IST)
पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा शुक्रवारी विविध केंद्रावर घेण्यात आली. या परीक्षेत  आधुनिक कॉपीचा  आगळा वेगळा प्रकार पिंपरी चिंचवड येथे समोर आला आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या .
सध्या  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरणे बंधनकारक आहे. पोलीस भरती परीक्षेसाठी पिंपरी चिंचवड केंद्रावर एका परीक्षार्थीने या मास्कचा पुरेपूर फायदा घेतला असून मास्कचा वापर कॉपी करण्यासाठी केला. या व्यक्तीने मास्कचा आत मोबाईल सदृश्य उपकरण तयार केले .त्या साठी त्याने बॅटरी , चार्जिंग केबल, बोलण्यासाठी माईक, स्पीकर आणि संपर्कासाठी सिमकार्डसह इतर तांत्रिक जोडणी केली होती . या मास्क मध्ये याने बोलण्याची आणि ऐकण्याची व्यवस्था देखील केली होती. 
पोलिसांच्या पथकाने या केंद्रावरील परीक्षार्थींची चाचणी केल्यावर या परीक्षार्थीचा  मास्क जड असल्याचे लक्षात आले. त्याच्या मास्कची तपासणी केल्यावर मास्कमध्ये कॉपीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे निर्दशनास आले. या परीक्षार्थीवर परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती