उच्चशिक्षित तरुणीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

बुधवार, 22 डिसेंबर 2021 (09:11 IST)
पुण्याच्या वाकड येथे एका उच्चशिक्षित तरुणीने चार मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. सोमवारी ही घटना घडली आहे. नम्रता गोकुळ वसईकर वय वर्ष 24 ही नंदनवन कॉलोनी माऊलीचौक येथील राहणारी होती. मयत मुलीच्या डोक्याला स्कार्फ बांधलेला होता. मुलीचे शिक्षण बीटेक झाले होते. या उच्चशिक्षित तरुणीने असे टोकाचे पाऊल का घेतले .तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. इमारती वरून उडी मारल्याने तिच्या डोक्याला जबर मार लागला आहे. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी ही तरुणी घरातून डोक्याला आणि  तोंडाला स्कार्फ बांधून निघाली .बराच वेळा झाला तरी ही घरी परतली नाही, म्हणून कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरु केले आणि पोलीस ठाण्यात जण बेपत्ता असल्याचे सांगून तिचा फोटो दाखवला. पोलिसांनी तिने आत्महत्या केली असल्याचे सांगितल्यावर कुटुंबीय हादरून गेले .वाकड पोलीस तपास करत आहे. 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती