पीएमपी बसेस पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए परिसरात धावतात. पीएमपी संबंधित मार्गांवर 1 ते80 किलोमीटरपर्यंत प्रवास करते. पीएमपीएने 80 किमीच्या प्रवासासाठी 11 टप्प्यांचे नियोजन केले आहे. त्यानुसार भाडे वाढवण्यात आले आहे. हे दर रविवार सकाळपासून लागू होतील. पीएमपीने तिकिटांसह पासचे भाडेही वाढवले आहे. पीएमपी प्रशासनाने यापूर्वी 2014 मध्ये भाडेवाढ लागू केली होती.