संपत्तीच्या वादातून एका भावाने आपल्या सख्ख्या मोठ्या बहिणीला पेटवून देण्याची धक्कादायक घटना औन्ध मधील एका सोसायटीत शुक्रवारी घडली.या घटनेत महिला गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी चतृशृंगी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपीला अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी मनोहर दारू पिऊन घरी आला आणि दोघांमध्ये वाटणीला घेऊन वाद सुरु झाले. रागाच्या भरात येऊन मनोहरने राजश्रींच्या साडी ला पेटवले.त्यांच्या दुसऱ्या भावाने आपल्या बहिणीला वाचवण्याचे आणि आग विझवण्याचे प्रयत्न केले.तो वर राजश्रीच्या साडीने पेट घेऊन मानेपासून पायापर्यंतचा भाग भाजला होता.तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.त्या 40 टक्के भाजल्या आहे.आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.