ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- सुनील कांबळे

सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (08:31 IST)
फोटो साभार : सोशल मीडिया 
भाजपचे पुणे कॅन्टोन्मेंट मतदसरसंघाचे आमदार सुनील कांबळे यांची एक ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. ज्यात त्यांनी महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप होत होता.मात्र आता आमदार सुनील कांबळे यांनी हा माझा आवाज नाही,असा दावा केला आहे.याशिवाय त्यांनी याबाबत मार्केट यार्ड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करत बदनामी करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 
माझ्या 35 वर्षाच्या राजकीय वाटचालीत देखील समाजातील महिलांचा मान सन्मान व जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत.माझ्या व्हॉट्सअ‍ॅपवर तसेच टीव्ही चॅनेलवरील बातम्या मधून मला समजले की कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पुणे पालिकेच्या एका महिला अधिकाऱ्यांना फोनद्वारे शिवीगाळ केली असल्याची खोटी ऑडिओ क्लिप प्रसारित केली आहे क्लिप मी सविस्तरपणे ऐकली असता त्यातील आवाज हा माझा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.ही ऑडिओ क्लिप संपूर्णत:बनावट असून पालिका निवडणुकीच्या तोंडावर माझी बदनामी करण्याचे हे राजकीय षडयंत्र आहे.बनावट व खोटी ऑडिओ क्लिप तयार करुन व प्रसारित करून माझी बदनामी करणाऱ्या विरुद्ध त्वरित कारवाई करावी,अशी मागणी आमदार कांबळे यांनी तक्रारीदारे केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती