ज्वेलरी दुकानात चक्क शाॅपच्या उद्घाटनाच्या दिवशीच झाली चोरी

शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (22:12 IST)
पुण्यातील लोणंद येथील ज्वेलरी दुकानात चक्क शाॅपच्या उद्घाटनाच्या दिवशीच चोरी झाल्याची घटना घडली. येथील लक्ष्मी गोल्ड ज्वेलरी दुकानात उद्घाटनाच्या दिवशीच डल्ला मारला आहे. याप्रकरणी दोन संशयितांना लोणंद पोलिसांनी  अटक केले आहे. ज्योत्स्ना सूरज कछवाय (वय 29, रा. आंबेगाव खुर्द, पुणे) आणि नीलेश मोहन घुते (वय 34, रा. गुजरवाडी फाटा, कात्रज, पुणे) अशी पोलिसांनी जेरबंद केलेल्या संशितांची नावे आहेत.
 
याबाबत माहिती अशी की, ही घटना घडल्यावर पोलिसांनी घटनेचा छडा लावण्यासाठी तपास सुरु केला. शहरातील तसेच दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये हे चोरटे पुणे येथील सराईत चोरटे असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार ज्योत्स्ना कछवाय आणि नीलेश घुते  यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरी केलेले दागिने, तसेच गुन्ह्यात वापरलेली कार हस्तगत करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती