गडकरी म्हणाले, तेव्हा माझ्यावर आणि फडणवीसांवर टीका

शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (16:48 IST)
पुण्यात उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते.त्यावेळी नितिन गडकरी हे अनेक विषयावर बोलत होते. आधीपासून पुण्याशी माझा जवळचा संबंध आहे.महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून विशेषतः पुण्याकडे,नागपूरकडे माझं लक्ष आहे. मी दोन्ही जिल्ह्यांना मदत करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. पुणे मेट्रोचं काम सुरू झालं नाही. नागपूरच्या मेट्रोचं काम पुढं गेलं.त्यावेळी माझ्यावर आणि फडणवीसांवर टीका झाली.असं त्यावेळी गडकरी यांनी म्हटलं आहे.
 
पुण्यातील उड्डाणपुलाच्या कार्यक्रमादरम्यान नितिन गडकरी  बोलत होते.त्यावेळी पुण्यात मेट्रो भुयारी करायची, की वरून सुरू करायची यावर वाद होते.आग्रहाने निर्णय घेतला आणि मेट्रोच्या कामाची सुरुवात झाली.याचा मला आनंद असल्याचं गडकरी म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले,एक कोटी रुपये मेट्रोची किंमत आहे.पुणे-कोल्हापूर, सोलापूर, बारामती,लोणावळा येथे ब्रॉड गेज मेट्रो चालणार आहे.2 बिझनेस क्लास विमानासारखे आहेत.विमानात हवाई सुंदरी असतात, तसेच येथेही असेल. त्याचं तिकीट एसटीच्या तिकीटीसारखं असणार आहे. 140 किलोमीटर याचा वेग आहे. त्यामुळे चंद्रकांत दादांना साडेतीन तासांत कोल्हापूरला जाता येईल,
 
पुण्यापासून बंगळुरूपर्यंत द्रूतगती महामार्ग बांधणार आहे.हा मार्ग फलटणवरून जाणार आहे.त्या महामार्गावर नवीन पुणे शहर तुम्ही वसवायचं. ते मेट्रो आणि रेल्वेने जोडायचं.पुण्यात वाहतूककोंडीची समस्या आहे.त्यामुळे आता मोठ्या शहराचं विकेंद्रीकरण करणे गरजेचे आहे.तसेच, सायरनचा आवाज कान फुटल्यासारखा येतो.जर्मन वायोलिन वादक होता.त्याला आकाशवाणीची एक ट्युन होती.ती ट्युन हॉर्नला लावण्याचे मी आदेश दिले असल्याचंही ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती