मिळालेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील तरुणीचे लग्न दिघी रहिवाशी मुलाशी 1 मे रोजी करण्याचे योजिले होते. लग्नाची तयारी सुरु झाली आणि सर्व बोलणी करून 27 मार्च रोजी सुपारीचा कार्यक्रम करण्यात आला. देवाणघेवाण साठी लग्नाच्या बस्त्यासाठी 80 हजार ,लग्नपत्रिकेसाठी 7 हजार आणि सर्व लग्नाच्या विधीसाठी 75 हजार रुपये असे एकूण 1 लाख 62 हजार रुपयांचा खर्च करण्यात आला.लग्नाची सर्व तयारी झाली पाहुणे देखील जमले होते.
दोन्ही पक्षात आनंदाचे वातावरण होते. 29 एप्रिल रोजी हळदीचा कार्यक्रम करण्याचे ठरले पण हळदीच्या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी नवरी पळून गेली. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार वधूच्या आईवडिलांनी पोलिसांमध्ये केली. नंतर वधू पक्षाने हळदीचा कार्यक्रम रद्द करण्याचे वर पक्षाला कळविले. लग्नासाठी सर्व नातेवाईक जमले होते. मुलगी एन हळदीच्या पूर्वी पळून गेल्याने वरपक्षाची बदनामी झाल्यामुळे वरपक्षाने वधू पक्षाच्या आई-वडील आणि भावाच्या विरोधात पोलिसात बदनामी आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली. पोलीस प्रकरणाचा तपास करत असून बेपत्ता नवरीचा शोध घेत आहे.