वाल्मिक कराड यांना दिलेल्या ईडीच्या नोटीसवर सुप्रिया-अजित समोरासमोर

शुक्रवार, 10 जानेवारी 2025 (16:08 IST)
बीडच्या मस्साजोग येथे गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली आहे. 
 
ईडीने कराड यांना 2022 मध्ये बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात नोटीस पाठवली मात्र त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या खासदार आणि कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. 

कराड यांच्यावर त्यावेळी कारवाई केली असती तर आज सरपंच देशमुख यांची हत्या झाली नसती. या विरोधात बजरंग सोनावणे यांनी संसदेत आवाज उठवला तसेच आमदार जितेंद्र आव्हाड आणि संदीप क्षीरसागर यांनी देखील विधानसभेत प्रश्न मांडला. मात्र कराडांवर कारवाईच्या बाबतीत केंद्र व राज्य सरकार ने काहीच उत्तर दिले नाही. असे त्या गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

या वर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी तुमच्याकडे पुरावे असतील तर कोर्टात देणे, सीआयडीकडे देणे, एसआयटीकडे देणे. पुराव्याशिवाय आरोप करणे कितपत योग्य आहे. असे प्रत्युत्तर पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी दिले. 

या प्रकरणाची चौकशी सीआयडी करत आहे. एसआयटीस्थापन करण्यात आली आहे. शिवाय न्यायालयीन चौकशी सुरु आहे. या मध्ये जो कोणी दोषी असेल त्याला अजिबात सोडले जाणार नाही त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल असे ते म्हणाले. 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती