राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान शिवसेना यूबीटीचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. यामुळे राज्यातील राजकारणात पुन्हा बंडखोरीचा आवाज उठवला जाणार असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरचंद्र पवार) बंडखोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा संजय राऊत यांनी बुधवारी केला.
शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला पक्षांतरासाठी चिथावणी देण्याचे काम दिले असल्याचा आरोप केला. सध्या अजित यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडे लोकसभेचा एकच खासदार आहे, तर शरद पवार गटाकडे आठ खासदार आहेत.