मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडे तब्बल 1 लाख लोकांचा डेटा तयार होता. या सगळ्यांना फसवण्यासाठी 16 ॲप तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. शिवाय, या अॅपच्या माध्यमातून फसवणुक करण्याची टोळीची तयारी होती.
याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास केला असता, संबंधितांचा डेटा, फोटो घेऊन ते मॅार्फ करून तुमच्या कॉनटॅक्ट लिस्टमधील लोकांना पाठवले जात होते. त्याबदल्यात पैसे मागणाऱ्या या दरोडेखोरांच्या मागे अगदी परदेशातल्या सिंडीकेट काम करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
याशिवाय, दरोडेखोरांनी फोन करण्यासाठी लाखो सिमकार्ड वापरले असून, ज्या खात्यांवर पैसे घेण्यात आले आहेत, हे सर्वजण कमी शिकलेले किंवा मजूर यांची आधारकार्ड बनवून त्यांवर तयार केलेली खाती ही फसवणुकीचे पैसे घेण्यासाठी वापरण्यात आली आहेत.