आज अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या मंगलदिनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला तब्बल 11 हजार आंब्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवात बाप्पांना 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी मंदार इसाई देसाई बंधू आंबेवाले चे मंदार देसाई आणि कुटुंबातर्फे हा नैवेद्य देण्यात आला. आंब्याचा प्रसाद पुण्यातील ससून रुग्णालयात ,वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथे वाटप करण्यात येणार आहे. या वेळी आपल्या लाडक्या बाप्पाच्या भोवती आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली तसेच मंदिरावर फुलांची आरास प्रवेश द्वारापासून गाभाऱ्यांपर्यंत रंगी- बेरंगी फुलांनी केलेली सजावट गणरायाच्या चरणी सेवा अर्पण करण्यात आली. आंब्यांची आरास पाहण्यासोबतच लाडक्या बाप्पाचे दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.स्वराभिषेकातून अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने पहाटे 4 ते 6 वाजे पर्यंत गायक अविनाश चंद्रचूड, विश्वजित जोशी, सावनी रवींद्र यांनी गायनसेवा श्रींच्या चरणी अर्पण केली. नंतर सकाळी 8 वाजेच्या सुमारास विशेष गणेशयाग करण्यात आले.