पुणे : अर्थिक कारणावरुन काँग्रेस पदाधिकाऱ्याचा खून झाल्याचे उघड

शनिवार, 17 डिसेंबर 2022 (15:09 IST)
पुणे: - आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर  गोळीबार करून खून करणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केले. त्यांच्या अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेतले आहे. सुफियान फैयाज चौरी (वय १९ रा. लक्ष्मीनगर, पर्वती पायथा ) आणि निलेश सुनील कुंभार  (वय ३०, रा. लक्ष्मी कॉलनी, हडपसर) अशी त्यांची नावे आहेत. समीर मनूर शेख (वय २८, रा. फालेनगर, आंबेगाव) असे हत्या करण्यात आलेल्याचे नाव आहे.
 
आंबेगाव बुद्रूकमधील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी  समीर शेख यांच्यावर सोमवारी दुपारी  दुचाकीस्वार आरोपींनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार करून हत्या केली होती. हल्लेखोर मार्केट यार्ड परिसरात असल्याची माहिती अमलदार राहूल तांबे आणि धनाजी धोत्रे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी धाव घेउन सुफियान चौरी, नीलेश कुंभार  यांच्यासह अल्पवयीनाला ताब्यात घेतले. ही कामगिरी अपर आयुक्त डॉ. राजेंद्र डहाळे, उपायुक्त सागर पाटील, एसीपी सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, उपनिरीक्षक नितीन शिंदे, उपनिरीक्षक अंकुश कर्चे, यांनी केली.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती