या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटानास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आत्तापर्यंत 20 सिलेंडरचा स्फोट झाला असल्याची माहिती समजत आहे. या घटनेमुळे कुणी जखमी किंवा जिवितहानी झाल्याचं अद्याप वृत्त नाहीये. मात्र, या स्फोटांच्या आवाजांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
नेमके गोडाऊन आहे की घरात ठेवलेल्या सिलेंडरचा स्फोट होत आहे याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. पण असं म्हटलं जात आहे की, ज्या ठिकाणी हे सिलेंडरचे स्फोट होत आहेत त्या ठिकाणी बेकायदा गॅस रिफिलिंग सुरू होतं आणि त्याच दरम्यान गॅस लिकेज होऊन स्फोट झाले.