सरपंचावर भर कार्यक्रमात धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला ,आरोपीला अटक

रविवार, 27 मार्च 2022 (17:29 IST)
पुण्यातील आंबेगाव तालुक्यात वडगाव पीर येथील सरपंचावर भर कार्यक्रमात धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सरपंच गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. संजय पोखरकर असे हे जखमी सरपंचाचे नावं आहे.सरपंच गावेच्या यात्रेत तमाशाच्या कार्यक्रमाला आले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
 
मिळालेल्या माहितीनुसार वडगाव पीर गावाचे सरपंच तमाशाच्या कार्यक्रमात मंचावर मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी आले असता मंचावरून परत येताना आरोपी ने त्यांच्यावर कोयत्याने वार केला. त्यांना काही समजेल आणि त्यांनी मागे वळून पाहता आरोपीने त्यांचा कपाळी वार केला आरोपीचे  नाव संतोष राजगुडे असून त्याने जुन्या बोरवेलच्या पाण्याचा वाटपाचा राग मनात धरून तीन वार केले. 
 
पहिला वार त्याने पाठीमागून केला नंतर दुसरा वार त्याने सरपंचाच्या टाळूवर आणि कपाळी केला. तिसरा वार करणार तो पर्यंत सरपंचाच्या सोबत असलेले सावळेराम फकिरा अदक यांनी आपल्या हातावर झेलला त्यामुळे त्यांच्या हाताला देखील जखम झाली. चोथा वार संतोष ने संजयच्या मनगटावर केला. या हल्ल्यात सरपंच गंभीर जखमी झाले आहेत. आरोपी संतोष आणि संजय यांच्यात सामायिक बोअरवेलच्या पाण्याच्या वाटपाच्या कारणावरून वादावादी झाली होती. त्याचा राग मनात घेऊन आरोपी ने सरपंचावर हल्ला केल्याचे पीडित सरपंचाने पोलिसांना दिलेल्या ताजर्रीर म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून प्रकरणाची नोंद के

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती