पुण्यातील धानोरी परिसरात अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर नागरिकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अतिक्रमण हटवण्यास विरोध करत संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली. तसेच कारवाईसाठी आलेल्या जेसीबीवर दगडफेक सुद्धा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महापालिका आयुक्तांनी प्रशासक म्हणून नियुक्ती केल्यानंतर महापालिका क्षेत्रात ज्याठिकाणी अतिक्रमण झाले आहे, तेथून अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत आज सकाळी पुणे शहरातील धानोरी परिसरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबविण्यात आली. या अतिक्रमणाला स्थानिकांनी विरोध केला होता. एवढेच नाही तर मनपाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करून मारहाण करण्यात आली. कारवाईसाठी गेलेल्या जेसीबीवरही दगडफेक करण्यात आली.