भारती विद्यापीठात महिला डॉक्टर्सच्या क्वार्टर्समध्ये बाथरूममध्ये कॅमेरे

गुरूवार, 8 जुलै 2021 (23:02 IST)
पुण्यातल्या भारती विद्यापीठात महिला डॉक्टर्सच्या क्वार्टर्समध्ये स्पायकॅम सापडलेत. बेडरूम तसंच बाथरूममध्ये कॅमेरे सापडल्यामुळे गोंधळ उडालाय. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न हॉस्पिटलमधील एका 31 वर्षीय महिला डॉक्टरनं याबाबत तक्रार दिली आहे. भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 
 
तक्रारदार महिला डॉक्टर कॅम्पसमधील क्वार्टर्समध्ये राहते. 6 जुलै रोजी संध्याकाळी आपली बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावल्याचं आढळून आल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलंय. डॉक्टरमहिला घरी आल्यावर तिने बाथरुममधील बल्ब लावला पण तो लागला नाही, बल्बही काही वेगळाच दिसत होता, तेव्हा या डॉक्टरने इलेक्ट्रीशियनला बोलवलं, पण तो म्हणाला की हा तर छुपा कॅमेरा आहे, असाच छुपा कॅमेरा बेडरुममध्येही दिसून आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती