पुण्यात चक्क महिला पोलीस अधिकाऱ्यालाच मारहाण

गुरूवार, 8 जुलै 2021 (15:59 IST)
पुण्यात चक्क महिला पोलीस अधिकाऱ्यालाच मारहाण करण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदी कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याला मित्रानेच मारहाण केली आहे. ‘माझ्यासोबत लग्न कर नाही; लग्न न केल्यास तुझे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेल’, अशी धमकी देत मारहाण महिलेला मारहाण करण्यात आली. 
 
सिद्धांत भगवानराव जावळे (वय ३०, रा. माजलगाव, जि. बीड) असं आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिद्धांत भगवानराव जावळे आणि पीडित महिला अधिकारी हे दोघे मित्र होते. त्या दोघांचे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. नंतर काही दिवसांनी आरोपीने महिलेवर सतत संशय घेऊन शिवीगाळ आणि मारहाण करायला सुरूवात केली. या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने लग्न करण्यास नकार दिला.
 
महिलेनं लग्न करण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने पीडितेच्या नातेवाईकांनाही फोन करून धमकी दिली होती. ‘माझं तिच्याशी लग्न लावून द्या; अन्यथा मी आत्महत्या करेन. अॅट्रॉसिटीचा तक्रार दाखल करेन. फेसबुक, युट्यूब आणि व्हॉट्सअपवर फोटो, व्हिडिओ व्हायरल करेन’, अशी धमकी दिली होती. आरोपी इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडित महिलेकडे पैशांची मागणीही केली होती.
 
‘तुझी नोकरी सोडून दे किंवा मला तुझा पाच वर्षाचा पगार दे’, अशी मागणी त्याने महिला अधिकाऱ्याकडे केली होती. साधारण मागील वर्षभरापासून आरोपी महिलेला त्रास देत होता. त्याच कालावधीत आरोपीनं पीडित महिलेकडून अनेकवेळा पैसे देखील घेतले आहे. या सर्व त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिला अधिकाऱ्यानं पोलिसांकडे तक्रार दिली दाखल केली आहे. सिद्धांत भगवानराव जावळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती