राज्यात पूर्व मौसमी पावसाचे आगमन होणार

सोमवार, 31 मे 2021 (21:30 IST)
पुणे अद्याप मान्सून आले नाही तरी राज्यात पावसाने जोर धरला असून काल पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद,नांदेड,या जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.या पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याचे वृत्त मिळाले आहे.या पावसामुळे शेतकरी बांधवांचे भरपूर नुकसान झाले असून त्यांच्या केळीच्या बागा उध्वस्त झाल्या आहे.  

राज्यात मान्सूनचं आगमन होणेसाठी अजून काही वेळ आहे.तरी ही अकाली पाऊस आल्याने पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यांचा जोरदार तडाखा शेतकरींना बसला आहे. पाऊस आल्याने वातावरणात थंडावा आल्यासह तापमानात घसरण झाली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन ते चार तास पुणे, सातारा, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, बीड, परभणी, हिंगोली,अहमदनगर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले आहे.
 
हवामान खात्याने मुंबईकरांना देखील सतर्कतेचा इशारा दिला असून सातारा,सांगली, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, मध्य महाराष्ट्र,मराठवाडा,विदर्भात देखील पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यांनी शेतकरी बंधूंना हाय अलर्ट दिले आहे. तसेच सतर्क राहा असे देखील सांगण्यात आले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती