पुण्यात निर्बंध शिथिल करण्यात आले -महापौर मुरलीधर मोहोळ

सोमवार, 31 मे 2021 (21:05 IST)
पुण्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने आता पुण्यात निर्बंध शिथिल होण्याची माहिती आज पुणेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
अत्यावश्यक सेवेसह शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी दोन वाजे पर्यंत खुली राहणार आहे.रेस्टोरेंट आणि बार हे घरपोच पार्सल सेवेसाठी सुरु राहणार.पीएमपीएमएल बस,हॉटेल,उद्याने बंदच राहणार आहेत.आता पर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 वाजे पर्यंत सुरु होती.परंतु आता या दुकानासह आस्थापना म्हणजे कपडा,भाजीमार्केट,ज्वेलर्स,सलून,ची दुकाने सुरु करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.कामाचे सर्व दिवस बँका आणि मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहणार आहे.या आदेशात मॉल्स वगळले आहेत.दुपारी 2 नंतर अत्यावश्यक सेवा तसेच मेडिकल दुकाने सुरु राहतील. 
 
शासकीय कार्यालयात उपस्थिती 25 टक्के असणार आहे.तसेच कृषी विषयक दुकाने देखील आठवड्याच्या सातही दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरु राहणार आहे.हॉटेल ,जिम,ला परवानगी नाही. नियम मोडल्यास कठोर कारवाई करण्याचे सुतवाक्य देखील मोहोळ यांनी दिले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती