तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर मिरवणूक काढत शक्तिप्रदर्शन केल्याप्रकरणी गुंड गजानन मारणे याच्याविरोधात आतापर्यंत वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात सात गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, अद्यापही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या घरावर नोटीस लावली आहे.
असलेल्या गुन्ह्यात गजा मारणे आणि त्याचे साथीदार फरार आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी शोध मोहीम केली. परंतु, अद्यापही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.त्यामुळे आता वारजे माळवाडी पोलिसांनी गजानन मारणे याला थेट नोटीस बजावली आहे.
निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांनी तळोजा कारागृह ते पुणे अशी समर्थकांसह रॅली काढली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात त्याने व त्याच्या साथीदारांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर गजानन मारणे व त्याची गॅंग फरार झाली. पोलीस त्याचा शोध घेत आहे. वेगवेगळी पथके त्यांच्या मागावर आहे. यादरम्यान पोलीस त्याचा संभाव्य अश्या सर्व ठिकाणी शोध घेत आहेत. तर त्याच्या संबंधित व्यक्तींकडे चौकशी केली जात आहे.