कचऱ्यात सापडले नवजात बाळ

शुक्रवार, 15 डिसेंबर 2023 (14:41 IST)
Pune News धायरी फाटा येथील मुख्य रस्त्यावर कचऱ्यात नवजात बाळ सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिस घटनास्थळी पोहचले आणि बाळाला ताब्यात घेतले. अर्भकावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे.
 
सिंहगड रस्ता पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केले आहे. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास सणस शाळे शेजारील कचराकुंडी जवळ नवजात बाळ दिसल्याची माहिती पुणे मनपाच्या कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली. ही माहिती पोलिसांना कळल्यावर पोलिसांनी पंचनामा करून अर्भक ताब्यात घेतले आहे.
 
या घटनेबद्दल पोलिस पुढील तपार करत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती