पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुनील एका खासगी कंपनीत कामाला होते. ते कंपनीत काम करण्याव्यतिरिक्त गोठ्याच्या साफ सफाईचे काम देखील करायचे. शुक्रवारी कंपनीतून सुटल्यावर जाधववाडी येथून ते पायी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांना थांबवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अचानक आपल्यावर झालेल्या हल्ल्यांनंतर त्यांनी आपल्याला वाचविण्यासाठी एका दुकानात शिरले आणि लपायचा प्रयत्न केला. परंतु आरोपींनी त्यांना खेचून बाहेर काढून त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. या घटनेचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन सुनील यांच्या मारेकरीला शोधत आहे.