मनसेकडून उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर टीका

बुधवार, 27 जुलै 2022 (14:36 IST)
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत सामनाचे संपादकआणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी घेतली. उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत काही गौप्य स्फोट केले. त्यांनी एकनाथ शिंदे गटावर या मुलाखतीच्या माध्यमातून टीका केली आहे. या मुलाखतीवर आता विरोधकांनी टीका करण्यास सुरु केलं आहे. या मुलाखतीवर मनसेकडून खिल्ली उडवण्यात आली आहे. 

मनसेचे पुण्यातील नेते हेमंत संभूस यांनी मुलाखत घेणारे हे घरचे, आणि त्याला छापून आणणारे ही घरचे हा पक्ष आहे की कौटुंबिक संघटना असे टीकास्त्र केले आहे. 
मुलाखत देणारे, घेणारे, छापणारे सगळे घरचेच, मनसेचे नेते हेमंत संभूस यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची खिल्ली उडवली. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती