मनसेकडून छोटे नवाब म्हणत आदित्य ठाकरेची उडविली खिल्ली

शुक्रवार, 15 जुलै 2022 (21:30 IST)
पक्षातील गळती रोखण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे मैदानात उतरले असून त्यांनी निष्ठा यात्रेची घोषणा केली आहे. आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा मुंबईतून सुरू झाली आहे . आदित्य ठाकरे यांचे मुख्य लक्ष्य मुंबई महानगरपालिका असून ते मुंबईतील २३६ शाखांना भेटी देणार आहेत. प्रत्येक शाखेत जाऊन आदित्य ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.  त्यानंतर गेल्या २-३ दिवसांत मीरा-भायंदर महापालिकेचे अनेक माजी नगरसेवक शिंदे गटाला पाठिंबा देण्यासाठी दाखल झाले होते. त्यानंतर मनसे नेते गजानन काळे यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटे नवाब असा करत त्यांची खिल्ली उडवली.

"छोटे नवाब यांच्या 'निष्ठा यात्रे'चे तर उलटे परिणाम दिसू लागलेत… आमदार, नगरसेवक यांनी साथ सोडल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी पण यांचा पक्ष सोडू लागले... आता यांना लवकरच 'शिल्लक यात्रा' काढावी लागणार असं दिसतंय... #शिल्लकसेना", असे ट्वीट करत त्यांनी आदित्य ठाकरेंना डिवचले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती