पुणे पोलीस दलात मोठे फेरबदल, सहा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

शनिवार, 31 जुलै 2021 (18:21 IST)
पुणे पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून, सहा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक अभय महाजन यांची बदली गुन्हे शाखेच्या युनिट 3 मध्ये करण्यात आली आहे. तर युनिट 3 चे पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांच्याकडे दरोडा व वाहन चोरी पथकाचा पदभार देण्यात आला आहे.
 
दरोडा व वाहन चोरी पथकाच्या पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांच्याकडे तांत्रिक विश्लेषण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. यासोबतच त्यांच्याकडे सामाजिक सुरक्षा शाखेची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.
 
आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयंत राजूरकर यांच्याकडे गुन्हे शाखेच्या युनिट 4 ची जबबदारी देण्यात आली आहे. तर यापूर्वी युनिट चारमध्ये कार्यरत असणारे रजनिष निर्मल यांच्याकडे प्रशासन विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
तर भरोसा सेलचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्याकडे तपास व अभियोग सहाय्यक पक्षाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती