पोलीस निरीक्षकांना निःशस्त्र पोलीस निरीक्षक पदावर तात्पुरत्या स्वरूपात बढती

बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (09:14 IST)
राज्यातील 438 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना निःशस्त्र पोलीस निरीक्षक पदावर तात्पुरत्या स्वरूपात बढती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) कुलवंत कुमार सारंगल यांनी काढले आहेत. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरात सात पोलीस निरीक्षकांची पदोन्नतीवर बदली झाली आहे.
 
पदोन्नतीवर पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या पोलीस निरीक्षकांमध्ये सोलापूर ग्रामीण, मुंबई शहर येथून प्रत्येकी दोन तर रत्नागिरी, पुणे आणि नागपूर येथून प्रत्येकी एक अधिकारी बदलीवर आले आहेत. त्यात एक महिला पोलीस निरीक्षक देखील आहेत. पिंपरी चिंचवड शहरातून पाच अधिकारी पदोन्नतीवर बदलून गेले आहेत.
 
पिंपरी-चिंचवडमधून सहाय्यक निरीक्षक पदावरून निरीक्षक पदावर पदोन्नती झालेले अधिकारी – (पदोन्नतीवर बदलीचे ठिकाण)
 
सुधीर चव्हाण (मीरा भाईंदर वसई विरार – कोकण दोन)
प्रमोद क्षीरसागर (गु अ वि – पुणे)
संतोष जाधव (गु अ वि – पुणे)
अमित कुमार मनेल (लोहमार्ग मुंबई – कोकण दोन)
निलेश वाघमारे (मुंबई शहर – कोकण दोन)
 
पिंपरी-चिंचवड शहरात निरीक्षक पदावर पदोन्नतीने आलेले अधिकारी – (बदलून आलेले ठिकाण)
 
युनूस मुलाणी (नागपूर शहर)
अनिल देवडे (सोलापूर ग्रामीण)
भोजराज मिसाळ (मुंबई शहर)
बडेसाहब नाईकवाडे (रत्नागिरी)
वनिता कृष्णा कदम – वनिता श्रीकांत धुमाळ (आगुशा गु अ वि पुणे)
दशरथ वाघमोडे (सोलापूर ग्रामीण)
सोन्याबापू देशमुख (मुंबई शहर)

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती