पुण्यात लोकसंख्येपेक्षा जास्त झाडे, शहरात वृक्षांची संख्या 47 लाख

शनिवार, 31 जुलै 2021 (18:19 IST)
पुण्यात लोकसंख्येपेक्षा जास्त झाडे शहरातील लोकसंख्येपेक्षा जास्त झाडे असल्याचे महापालिकेच्या पर्यावरण सद्य:स्थिती अहवालातून स्पष्ट झाले आहे. शहरात ग्रीन कव्हर चांगले आहे. 35 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात वृक्षांची संख्या 47 लाख 13 हजार 791 आहे.
 
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील वृक्षगणना करण्यात येत आहे. पालिकेने जीपीएस ग्लोबल पोझिशनिंग – सिस्टिम आणि जीआयएस जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टिम यांसारख्या प्रणालीचा वापर केला आहे
 
या अंतर्गत झाडांच्या स्थानांची अचूक माहिती, एकूण संख्या यांसारख्या घटकांचे सर्वेक्षण केले जाते. शहरात ग्रीन कव्हर चांगले आहे. 35 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात वृक्षांची संख्या 47 लाख 13 हजार 791 आहे. झाडांच्या एकूण प्रजाती 429 आहेत. गिरिपुष्प या झाडाची संख्या सर्वांत जास्त आहे. दुर्मिळ वृक्षांची संख्या 124 आहे. सर्वात मोठे झाड वडाचे असून, ते 1202 सेंटिमीटर आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती