आळंदीत इंद्रायणी नदी जलप्रदूषणामुळे फेसाळली

शनिवार, 11 नोव्हेंबर 2023 (17:40 IST)
महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या देवाची आळंदी येथील इंद्रायणी नदी वारकरी संप्रदायासाठी खूप पवित्र आहे. इंद्रायणी नदी जल प्रदूषणामुळे फेसाळली आहे. नदी काठी असणाऱ्या काही कारखान्यातील रसायनयुक्त पाण्यामुळे तसेच नदी काठी असलेल्या गावातील मैलामिश्रीत सांडपाणी इंद्रायणीच्या नदी पात्रात सोडल्यामुळे इंद्रायणी मोठ्या प्रमाणात फेसाळली आहे. 
 
10 नोव्हेंबर रोजी इंद्रायणी नदी फेसाळली असून मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त पाणी पाण्यावर तरंगत होत. एखाद्या हिमनदी सारखी इंद्रायणी दिसत होती. इंद्रायणी फेसल्यामुळे नदी काठी राहणाऱ्या नागरिकांना आणि आळंदीत राहणाऱ्या वारकऱ्यांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. 

आळंदीला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला इंद्रायणीच्या काठावर लाखो वारकरी बांधव नदीत स्नान करतात. आणि ते पाणी पितात. इंद्रायणी नदी फेसाळल्यामुळे तिथे राहणाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
इंद्रायणी सेवा फाऊंडेशनच्या वतीने इंद्रायणी नदी जलप्रदूषीत होऊ नये यासाठी आळंदीमध्ये साखळी उपोषण करण्यात आले.
 


Edited by - Priya Dixit   
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती