मिलटरी कॅन्टिनमध्ये असलेल्या अस्सल आणि स्वस्त दारुचा स्टॉक मिळावा असा अनेकांचा प्रयत्नही असतो. बाहेर दारु कितीही मिळत असली तरी मिलटरी कॅन्टिनमधील दारुविषयी अट्टल शौकिनांना कायमच आकर्षण राहिले आहे. लष्करी अधिकार्यांच्या घरात काही नसले तरी दारुचा खास स्टॉक असतो, असे समजले जाते. खडकीतील एका घरफोडीच्या गुन्ह्यात हा समज खरा ठरला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे लेफ्टनंट कर्नल खडकीतील डंकन रोडवर राहतात. ३ ते ९ नोव्हेबर दरम्यांन त्यांचा फ्लॅट बंद होता.चोरट्यांनी फ्लॅटचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला.हॉलमधील व बेडरुममधील कपाटातील चांदीची भांडी व १५ दारुच्या बाटल्या असा ५६ हजार रुपयांचा माल चोरुन नेला.सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.