देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनेक चाहते आहेत. अशाच एका मोदी भक्ताने पुण्यात चक्क पंतप्रधान मोदींची मूर्ती उभारली आहे. पुण्याच्या औंध येथे पंतप्रधानांना चक्क देवाचा दर्जा देत त्यांचे छोटेखानी मंदिर तयार करुन मोदींची २ फुटांची मूर्ती त्यात बसवण्यात आली आहे. १५ ऑगस्टला ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.नमो फाउंडेशनच्या वतीने तयार करण्यात आले आहे. पुण्यातील भाजपचे कार्यकर्ते असलेल्या मयूर मुंढे यांनी मोदींचे हे मंदिर बांधले आहे.
नमो मंदिरच नाही तर मयूर मुंढे यांनी पंतप्रधानांवर तयार केलेली कविता देखील आकर्षणाचा विषय ठरली आहे. विरोधकांनी ट्रोल केले तरी चालेल पण मला मोदींकडून प्रेरण मिळते,असे म्हणत मयूर यांनी मोदींवर केलेल्या कविता मंदिराच्या बाहेर लावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मोदींच्या कामांचा उल्लेख करणारे फलक देखील तिथे मांडण्यात आले आहेत. पुण्याच्या ओंध येथे राहणाऱ्या मयूर मुंढे यांनी पिंपरी चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांच्याकडून खास जयपूर येथून मोदींची २ फुटांची १ लाख ६० हजार रुपयांची मूर्ती तयार करुन घेतली.